प्रतिनिधी फलटण:
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड द्वारे संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट विद्युत मीटर बसवण्याची सक्ती केली आहे. यामुळे राज्यातील सामान्य नागरिकांचे आर्थिक शोषण करण्याचा घाट शासनाने घातला आहे.
आम आदमी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष श्री अजित फाटके म्हणाले, स्मार्ट विद्युत मीटर निर्मिती व जोडणीची किंमत प्रति मीटर सहा हजार रुपये अपेक्षित असताना या किमतीत दुपटीने वाढ करून बारा हजार रुपये प्रति मीटर दराने खाजगी कंपनीला दिले आहे.भांडवलदारी खाजगी कंपनी यांना फायदा करून देण्याच्या हेतूने शासनाने ठरवले आहे. ग्राहकांना प्रीपेड वीज बिल भरून ठेवणे बाद्य राहील.या योजनेस आमचा पूर्ण पणे विरोध आहे असे सांगीतले.
सदर स्मार्ट विद्युत मीटर प्रणालीला विरोध दर्शवण्यासाठी आज फलटण तालुका आम् आदमी पक्षाने महावितरणचे कार्यकारी अधिकारी यांना भेटून निवेदन दिले. यावेळी उपस्थित सातारा जिल्हा युवा अध्यक्ष श्री धैर्यशील लोखंडे,फलटण तालुका अध्यक्ष श्री. वीरसेन सोनवणे,उपाध्यक्ष श्री अनिकेत नाळे,शहराध्यक्ष डॉ.महेशकुमार खरात, सौ. मंगलताई जाधव,सौ. स्नेहल भोसले ,प्रकाश शिंदे ,संदेश अहिवळे या वेळी उपस्थित होते.