प्रतिनिधी सातारा:
सातारा जिल्ह्यातील हजारो कोटींच्या जिल्हा बँक नियंत्रित दुबार पिककर्ज व पंजाबराव देशमुख व्याज सवलत घोटाळा प्रकरणी सुरु असलेल्या ईडी चौकशीत जिल्हा बँकेचा खरा चेहरा समोर आला.
सातारा जिल्हा बँकेतील भ्रष्ट केडर सचिव संघटनेची मुख्य व्यवस्थापक भ्रष्ट अधिकारी राजेंद्र सरकाळे, जिल्हा सहकार प्रशासनातील भ्रष्ट देशद्रोही DDR मनोहर माळी, जिल्ह्याची भ्रष्ट ठरलेली लीड बँक, आणि सर्व 11 तालुक्यातील सहाय्यक निबंधक कार्यालये कोणतीही माहिती जाहीर न करू शकल्याने 4 एप्रिलला 7 दिवसांची शेवटची संधी दिली होती.
तरीही देशद्रोही मनोहर माळी, शेतकऱ्यांना लुटणारी व त्यांचं आर्थिक, सामाजिक, राजकीय शोषण करणारी यंत्रणा म्हणजे जिल्हा बँक, महाराष्ट्र बँक, सर्व 11 तालुका निबंधक कार्यालय कोणतीही माहिती देतं नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होतं शासनाला योग्य तो अहवाल जावा यासाठी आम्ही application for no say बरोबर वर्धनगड विकास सेवा सोसायटी प्रकरणात झालेल्या FIR ची प्रत सर्व सहकारी यंत्रणा व केंद्रिय तपास यंत्रणा यांना दिली आहे. सदर प्रकरणात सर्व शासकीय यंत्रणेवर पण कारवाईची मागणी केली आहे. असे माहिती अधिकार कार्यकर्ते व श्रीमंत महादजी शिंदे शेतकरी संस्था, महाराष्ट्र राज्य. श्री. किशोर शिंदे यांनी सांगितले.