Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

इंडिया आघाडी घटक पक्षांची माढा मतदार संघ मधील फलटण तालुका आघाडी समविचारी पक्ष पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली.

www.janakroshlive.com

प्रतिनिधी फलटण:


           माढा मतदारसंघ शरदचंद्र पवार गटाने इंडिया आघाडी तर्फे माननीय श्री धैर्यशील मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज रोजी लोकसभेसाठी सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल करण्यात आला. तुतारी चिन्ह घेऊन निवडणूक लढवण्यात येणार असल्याचे प्रतिनिधी यांनी सांगितले.
या अनुषंगाने आज फलटण तालुका इंडिया आघाडी घटकपक्ष यांची बैठक फलटण येथे पार पडली.



या बैठकीमध्ये समविचारी पक्ष एकत्र येऊन देशांमध्ये सुरू असलेले देशातील खुनशी राजकारण होत असल्याकारणाने आणि लोकशाहीकडून हुकूमशाही कडे चाललेला भारत देश व भारत देशांमधील सध्या घडत असलेल्या घटना व विरोधी पक्ष यांच्यावर होत असलेल्या कारवाया व शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्ष संपवण्याचे षडयंत्र सरकारकडून रचले जात असल्याने नागरिक मध्ये प्रचंड भाजप विरोधात द्वेष निर्माण झाला आहे.
भाजप विरोधात एक संतापाची लाट उसळली असल्याकारणाने,भाजप विरोधी काम करण्यासाठी सर्वांनी एकमत झाले.या वेळी मा.श्री. धैर्यशील मोहिते पाटील गटाचे समन्वयक उपस्थित होते.फलटण तालुका काँग्रेस कमिटी,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार ,आम् आदमी पक्ष,शिवसेना उद्धव ठाकरे गट,शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.