देशातील सद्य परिस्थिती पाहता हुकूमशाहीचे वातावरण पूर्ण देशांमध्ये पसरण्यात येत आहे.त्यामुळे राजकारणाकडे सामान्य नागरिकाचा बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला आहे. गलिच्छ झालेल्या या राजकीय वातावरणात,माढा मतदारसंघातील सध्या परिस्थिती पाहता प्रस्थापित राजकीय नेते यांची मागील वाटचाल व कारकीर्द पाहता ते आपल्या इंडिया आघाडीतून उमेदवारी घेऊन शेवट पर्यंत टिकून राहतील असे वाटत नाही. त्यामुळे माढा मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे श्री धैर्यशील अंकुशराव लोखंडे किंवा श्री अनिकेत किसन नाळे हे अपक्ष फॉर्म भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच माढा मतदारसंघातून इंडिया आघाडीचे कोणताही उमेदवार जर घोषित नाही झाला तर आम आदमी पक्षाचे पदाधिकारी अपक्ष उमेदवारी अर्ज करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या राजकीय परिस्थिती पाहता इंडिया आघाडीचे उमेदवार शेवटपर्यंत टिकेल की नाही अशी थोडीशी साशंकता वाटत आहे. मी आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपणास एक ग्वाही देतो की कोणत्याही दबावाला किंवा कोणत्याही राजकीय आमिषाला बळी न पडता शेवटपर्यंत निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री अनिकेत किसन नाळे फलटण तालुका उपाध्यक्ष यांनी सांगितले.उमेदवारी अर्ज कोणत्याही परिस्थितीमध्ये माघारी घेणार नाही याची हमी देऊन.अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.