भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त नगरपरिषद फलटण समोर आम् आदमी पक्ष फलटण तालुका यांचे वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी कुमार विश्वजीत सचिन सोनवलकर राहणार दुधेबावी या चिमुकल्याने अतिशय सुंदर असे भारताचे संविधान ची उद्देशिका बोलून दाखविली यामुळे तरुण पिढीमध्ये एवढ्याशा चिमुकल्याने एक नवचैतन्य निर्माण करण्याचे काम केले. यावेळी सर्व उपस्थित मंडळींनी या चिमुकल्याचे अभिनंदन तसेच कौतुक केले. या कार्यक्रमास उपस्थित, सातारा जिल्हा युवा अध्यक्ष श्री धैर्यशील अंकुशराव लोखंडे, फलटण तालुका अध्यक्ष श्री वीरसेन सोनवणे, फलटण तालुका उपाध्यक्ष श्री अनिकेत किसन नाळे, फलटण शहराध्यक्ष डॉ. महेश कुमार खरात, सामाजिक कार्यकर्ते श्री मोरे साहेब व समाजातील इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.