आम् आदमी पक्ष सातारा जिल्हा नवनियुक्त अध्यक्ष ॲड.श्री. धीरज जाधव आणि टीम यांनी आज फलटण येथे भेट दिली.या प्रसंगही इंडिया आघाडी चे उमेदवार समवेत आम् आदमी पक्षाने सक्रिय प्रचार करण्यास सांगीतले. फलटण तालुक्यातील आगामी विधान सभा लढवण्याचे लक्ष ठेवून पक्षाचे धेय्य धोरणे सामान्य जनते पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील रहावे अशी चर्चा झाली. या साठी फलटण तालुक्यातील जनता आम् आदमी पक्षाला सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.या वेळी सातारा जिल्हा युवा अध्यक्ष श्री. धैर्यशील लोखंडे,फलटण तालुका अध्यक्ष श्री. विरसेन सोनवणे,उपाध्यक्ष श्री.अनिकेत किसन नाले, फलटण शहर अध्यक्ष शास्त्रज्ञ डॉ. महेश कुमार खरात सर या वेळी उपस्थित होते.