Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

मलठण मधील महातपूरा पेठ येथील एकाला जातीवाचक शिवी व मारहाण

प्रतिनिधी:  वीरसेन सोनवणे


वैभव अरुण शिंदे वय 24 हे राहणार महत्त्व पेठ मलठण हे पतंग उडवत असताना नागपंचमी दिवशी वेताळ बाबा मंदिर शेजारी मोकळ्या मैदानात दुपारी दीड वाजता च्या सुमारास सण असल्याने त्यांचे मित्र किरण लक्ष्मण पवार ,वैभव उर्फ सुंदर अरुण शिंदे, किरण सोनवणे ,शुभम अरुण शिंदे असे पतंग उडवीत असताना वैभव नाना घुले राहणार इंदिरानगर झोपडपट्टी मलठण, फलटण हे त्या ठिकाणी आले. त्यावेळी नशा करून आलेला होता त्याने सर्वांना जातीवाचक शिवीगाळ केली तसेच शेजारी पडलेली वीट उचलून वैभव यांच्या डोक्यामध्ये मारली त्यामुळे त्यांना मार लागल्यामुळे जखमी झाले सदर व्यक्तीवर जिल्हा उप रुग्णालय फलटण येथे उपचार सुद्धा सुरू असून वैभव नाना घुले यांचे विरुद्ध फलटण पोलीस स्टेशन येथे जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.