*फलटण नगरपालिकेत बोगस टोइंग कारचा वापर, गाडी सेवेत आल्यापासून गाडीला नंबरच नाही*
फलटण नगरपालिका मालकीची नो पार्किंग मधील गाड्या उचलण्याची टॉइंग कार ला RTO च पासिंग गेले एक वर्षापासून नसल्याचे निदर्शनास आले असता आम आदमी पार्टी पक्षाचे उपाध्यक्ष श्री अनिकेत किसन नाळे यांनी संबंधित कारचालकाला विचारणा केली असता संबंधित कारचालकाने अरे रवी ची भाषा वापरली. फलटण नगरपालिकेमध्ये आशा अनाधिकृत कारवापरण्यासाठी कोणाचा परवाना? सदर बेकायदेशी रोइंग कार नगरपालिकेने त्वरित बरखास्त करून योग्य ती दंडात्मक कार्यवाही करावी अशी अपेक्षा श्री अनिकेत किसननाळे यांनी व्यक्त केली. सदर कार फलटण शहरामध्ये बेकायदेशीर रित्या फिरत असून याच्यावरती आरटीओ व फलटण पोलीस वाहतूक शाखेतून व कार्यालयातून कोणत्याही प्रकारचे कारवाई केली जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. सदर कंत्राट दारावर कार्यवाही न केल्यास आम आदमी पक्षाच्या वतीने नगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सातारा जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष श्री. धैर्यशील लोखंडे यांनी दिला आहे.