Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

*आम आदमी पार्टी पक्षाचे वाई तालुक्यात जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन*

 *आम आदमी पार्टी


पक्षाचे वाई तालुक्यात जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन*

शनिवार दि. ०८/०७/२०२३ रोजी आम आदमी पार्टी पक्षाचे वाई तालुक्यात आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संदिप देसाई यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पार पडले,


स्थळ:-  आम आदमी पार्टी वाई तालुका जनसंपर्क कार्यालय गाळा नंबर ५, ज्ञानदेव नगर, सर्किट हाऊस रोड, सिद्धनाथ वाडी, डॉक्टर पाटील हॉस्पिटल जवळ वाई.... 

 या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांचे भाषण झाले...., 

या कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, संदीप देसाई सातारा जिल्हाध्यक्ष, शिवाजी जाधव  सातारा उपाध्यक्ष, रतन पाटील  सातारा जिल्हाध्यक्ष (अनु.जाती), नितीन गायकवाड सातारा जिल्हा संघटक, धीरजसिंह जाधव सातारा जिल्हा सचिव, मारुती जानकर सातारा जिल्हा प्रवक्ता, निवृत्ती शिंदे वाई-विधानसभा युवा अध्यक्ष, साहिल भोसले व वाई तालुका अध्यक्ष, नितीन जगताप, एडवोकेट रोहिदास हाके, संदीप सपकाळ, सुधीर कांबळे, अभिजीत रेणूसे, धनंजय घाटे, मच्छिंद्र सपकाळ, प्रमोद शिंदे, संजय गायकवाड इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


पक्षाच्या कार्यालय उद्घटना वेळेस भरपूर कार्यकर्त्यांचा आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश घेण्यात आला. 

जनसंपर्क कार्यालयाच्या वेळेस पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप देसाई यांच्यासोबत जनतेच्या विविध  विषयावर चर्चा करण्यात आली, जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यास आम आदमी पार्टी सक्षम आहे, अशी आशा व्यक्त केली. आम आदमी पार्टी यायचं कारण म्हणजे आम आदमी पार्टी संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली व पंजाब मध्ये मोफत शिक्षण, मोफत आरोग्य, मोफत पाणी, मोफत २०० युनिट पर्यंत वीज, महिलांसाठी मोफत प्रवास जर महाराष्ट्रात आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन झाल्यास इत्यादी योजना सुरू होतील. आत्ताचे राजकारण पाहता आम आदमी पार्टीच योग्य आहे, असे सामान्य जनतेला वाटत आहे......,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.