विडणी ग्रामपंचायत चे माजी ग्रामसेवक व माजी सरपंच यांची होणार चौकशी .
2017-2022 मध्ये विडणी ग्रामपंचायत मध्ये पैश्यांची अफरातफर.
विडणी ग्रामपंचायत व्दारे दिनांक 01/01/2015 ते मला माहीती देणाऱ्या तारखेपर्यंतच्या कालावधी मधील योजना निहाय आलेल्या अनुदानाची व केले पुस्तक बैंक खाते पुस्तकाच्या सत्य प्रतीची माहीती मागवली होती त्या माहिती नुसार माजी सरपंच ग्रामसेवक तसेच इतर काही मंडळी यांच्या नावे पैसे काढले गेलेत यांच्या नावे 35 ते 40 लाख तसेच माजी ग्रामविकास अधिकारी यांचे नावे 11 से 12 लाख काढले गेलेत ते पैसे सरपंच ग्रामविकास अधिकारी यांचे नसून ते जनतेचे आहेत त्यामुळे ते पैसे कशासाठी म्हणजे कोणत्या कामासाठी आणि कुठे काम केले आहे त्याची चौकशी करण्यात यावी म्हणून मागणी करून तसेच सोबत त्याचे पुरावे जोडून देखील अद्याप चौकशी झालेली दिसून येत नाही .त्यांना पाठी आड लपविण्याचा का प्रयत्न केला जातोय .ते पण समजत नाही असे आदमी पार्टी च्या वतीने श्री अनिकेत किसन नाळे यांनी सांगितले त्या नंतर चौकशी करण्यासाठी कोणतीही टाळाटाळ होणार नाही तसेच कोणालाही पाठीआड लपविण्याचा प्रयत्न केला जाणार नाही अशी हमी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तसे न झाल्यास भारत सरकार मान्यता प्राप्त भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा अध्यक्ष तसेच आम आदमी पक्षाचे फलटण तालुका उपाध्यक्ष श्री अनिकेत किसन नाळे,आम् आदमी पार्टी चे सातारा जिल्हा युवा अध्यक्ष श्री धैर्यशील अंकुशराव लोखंडे यांच्या कडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे .