*जिल्हा परिषद शाळा ढवळ ची अधोगती सुरू...बेफिकीर शिक्षण व्यवस्था,निर्ढावलेले राजकीय पुढारी, असाह्य पालक ..*
ढवळ गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढवळ ची आवस्था या पेक्षा काही वेगळी नाही....जवळ जवळ अंदाजे 30 ते 32 मुलांचे दाखले 15 जून 2023 पासून काढून घेतले आहेत..ती सर्व मुले आस पासच्या वाखरी,दालवडी, ताथवडा,येथील शाळेत प्रवेशासाठी गेले आणि प्रवेश घेतले.याचे कारण पालकांकडून आम्ही भेटून समजून घेतले असता समजले की 1ली ते 5वी इयत्तेतील मुलांना मराठी लिहिता वाचता येत नाही, इंग्लिशचां विषयच सोडा,या शाळेतील मुल सर्व सामन्या कुटुंबातील,मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणर्या पालकांची मुल आहेत.जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिकवतच नाहीत का?का शिक्षकांना कोणत्या गोष्टीची कमी आहे का? पालक समिती असलेल्या शाळेचे शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि समितीचे सदस्य काय करता आहेत याला परिवर्तन म्हणायचे का ? या मुलांच्या आयुष्यातील हा अमूल्य वेळ परत येईल का? या सर्वां अधोगतीला जबाबदार कोण? शासनाने आणि सामजिक संस्थांनी दिलेले सर्व कॉम्प्युटर वापरावीना अडगळीच्या खोलीत धूळ खात कापडाणे झाकून ठेवले आहेत. ते शिकवण्या इतके ज्ञान कोणाकडे नाही का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शिक्षक, गटशिक्षण अधिकारी आणि शिक्षण समितीने दिली पाहिजेत.पालक जीव तोडून सांगतायत आमची मुल शिकली पाहिजेत आम्ही पडेल ते कष्ट करू जिल्हा परिषद शाळा वाचवा आमची परिस्थिती नाही खाजकी संस्था मध्ये पोर शिकवायची..आम्हाला शिक्षण परवडणार नाही.मागील 3 वर्षातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढवळ यांचा पट संख्या बघता आत्ता जी अधोगती सुरू आहे याला जबाबदार कोण आहे? या मुलांचे भविष्य अंधारात लोटू नका ढवळ गावाला दानशुरांची कमी नाही..गरज आहे ती स्थानिक नेतृत्वाने पुढाकार घेण्याची.
राजकारण बाजूला ठेवा सर्वांनी एकत्र या यावर तोडगा काढू शिक्षकांना काय कमी पडतंय बघू त्यांची बाजू समजून घेऊ... ग्रामस्थांनी साथ द्या जाणत्या लोकांनी पुढे या पुढाकार घ्या आम्ही तुमच्या बरोबर आहे.पण जिल्हा परिषद शाळा वाचवा गरीबच लेक-लेकीला शिकवा ही आपली सामजिक बांधिलकी आहे.
असे मत ढवळ चे ग्रामस्थ तसेच आम् आदमी पक्षाचे सातारा जिल्हा युवा अध्यक्ष मा.श्री.धैर्यशील अंकुशराव लोखंडे (9405589187)यांनी व्यक्त केले.