*आम् आदमी पक्ष स्वराज्य संवाद कोपरा सभा*
15 जून 2023 रोजी माझं गाव विडणी तालुका फलटण ,तालुक्याच्या राजकारणात नेहमीच पटलावर राहिलेलं हे गाव आणि गावातील लोकांना नेहमीच गृहीत धरून घेतले गेले ले राजकीय निर्णय याला त्रस्त ग्रामस्थ यांच्या सोबत विडणी येथे आम आदमी पार्टी फलटण यांच्या मार्फत स्वराज्य संवाद करण्यात आली. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील दहाबिघे येथील मारुती मंदिर परिसर ग्रामस्थांनी आणि तरुण वर्गाने भरला होता.लोकांची उपस्थिती गावची अस्वस्थता दर्शवत होती कदाचित त्यांच्या मनातील गोष्टी,अडचणी आणि त्यांना होणारा मनस्ताप कोणी तरी बोलतोय हे एकण्यासाठी सर्व मंडळी उपस्थित होती.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ची झालेली भयावह शैक्षणीक परिस्थिती खाजगी शाळा आणि त्यांचे बाजारीकरण असह्य झालेले पालक,आरोग्य व्यवस्था आणि लोकांची आर्थिक पिळवणूक करणारे आपलेच नेते मंडळी,गावातील गटा तटाच राजकारण आणि तरुणाई ची दिशाभूल,वाढती महागाई, आणि दिली सरकार देत असलेल्या सर्व मोफत सुविधा आणि त्याचा येणार सर्व आर्थिक खर्च कसा आणि कुठून केला जातो याची संपूर्ण माहिती, भारतीय कर प्रणाली आणि सामान्य जनते कडून अप्रत्यक्ष घेतला जाणार कर, राजकारण्यांनी बेरोजगार युवकांना नोकरीच्या नावाखाली केली जाणारी 12000 रू पगार देऊन केली जाणारी आर्थिक आणि मानसिक खच्चिकरण या सर्व परिस्थितीवर भाष्य करणारी कोपरा सभा पार पडली.
आम् आदमी पक्षाची तालुक्यातील राजकारण आणि शेतकऱ्यांना होणारा त्रास या सर्व बाबी सकारात्मक चर्चा झाली. मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधत व्यवस्था परवर्तनाची ही धडपड नक्की विडणी च्या लोकांना गरजेची वाटेल कदाचीत वाटली असावी आणि आम आदमी पार्टी ला स्वराज्याचा शिलेदार म्हणून स्वीकार करतील अशी अपेक्षा आणि आपल्या सर्वाचे खूप आभार. असेच प्रेम आपण सर्व करत राहाल ही प्रांजळ भावना.
आपलाच ,
*फलटण तालुका अध्यक्ष*
*श्री.अनिकेत किसन नाळे*
*9595410100*
#स्वराज्य_यात्रा
#स्वराज्य_संवाद
#आपल_फलटण_ग्रामीण
#पुरोगामी_महाराष्ट्र