Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

*फलटण तालुक्यात आम् आदमी पक्षाची स्वराज्य संवाद यात्रा ग्रामीण भागात गावोगावी जाणार - धैर्यशील लोखंडे (आम् आदमी पक्ष)*


 *फलटण तालुक्यात आम् आदमी पक्षाची स्वराज्य संवाद यात्रा ग्रामीण भागात गावोगावी जाणार - धैर्यशील लोखंडे (आम् आदमी पक्ष)*


 आम् आदमी पक्ष सातारा जिल्हा व फलटण तालुका येथे ग्रामीण स्वराज्य संवाद यात्रा सुरू आहे.नागरिकांशी संवाद साधून आम् आदमी पक्ष आपली राजकीय भूमिका महाराष्ट्रात ग्रामीण भागात गावो गावी जाऊन स्वराज्य संवाद सभे द्वारे नागरिकांना आम् आदमी पक्षाची धेय धोरणे तसेच  दिल्ली आणि पंजाब मध्ये होत असलेले कामे आणि जनतेला समधना कारक मिळणाऱ्या जागतिक सुविधा आणि महाराष्ट्रात होत असलेली जनतेची पिळवणूक या विषयावर जनजागृती व मार्गदर्शन करत ही यात्रा तालुक्यातील प्रत्येक गावात ही संवाद यात्रा घेऊन जाणार आहेत. 

नुकतीच स्वराज्य संवाद यात्रेचे आयोजन विडणी या गावातील दहभिगे येथे करण्यात आले होते.यावेळी विडणी गावातील तरुणाची तसेच ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थित कौतुकास्पद होती.

आम् आदमी पक्षाचे मुंगी सारखे कार्यकर्ते तरुण वर्गाला राजकारणात उतरण्यासाठी ही प्रोत्साहित करत आहेत.आम् आदमी पक्षाचे सातारा जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष श्री धैर्यशील अंकुशराव लोखंडे यांनी या वेळी तालुक्यात होत असलेली शिक्षणाचे खाजगीकरण आणि त्याचे बाजारीकरण,आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार आणि शासकीय अधिकारी आणि महावितरण कंपनी यांच्या कडून होत असलेली शेतकऱ्यांची आणि नागरिकांची आर्थिक पिळवणूक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ची झालेली दुरवस्था आणि कंत्राटी राज ,बेरोजगारी मुले त्रस्त असलेला तरुण वर्ग आणि त्यांच्या अडचणी,उंद्रा majra सारखे भांडणारे राजकीय पुढारी, श्रेय वादात अडकलेला तालुक्याचा भौगोलिक विकास यावर भाष्य करून सत्य परिस्थिती नागरिक समोर मांडली. 

भविष्यात येणाऱ्या सर्व निवडणुका आम् आदमी पक्ष स्वबळावर लढेल. आम् आदमी पक्ष तालुक्यांतील तरुण वर्गाला आकर्षित करत आहे.त्याच बरोबर फलटण तालुक्यातून पक्षाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने समाधान व्यक्त केले. 

या वेळी विडणी ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच फलटण तालुका अध्यक्ष श्री विरसेन सोनवणे,तालुका उपाध्यक्ष श्री. अनिकेत किसन नाळे ,फलटण शहर अध्यक्ष डॉ.श्री. महेश खरात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.