आम आदमी पार्टी - तर्फे स्वराज यात्रा पश्चिम महाराष्ट्रात आयोजित केली आहे ही यात्रा रविवार २८ मे २०२३ विठू माऊली चे दर्शन घेऊन श्री क्षेत्र पंढरपूर येथून मार्गक्रमण करून गुरुवार १ जून २०२३ रोजी साताऱ्यात दाखल झाली तसेच मार्गक्रमण करून शुक्रवार दिनांक २ जून २०२३ वाई- विधानसभेमधील खंडाळा शहरात दाखल झाली. सकाळी ठीक ११.०० वाजता स्वराज्य यात्रा मानसी हॉस्पिटल पारगाव पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पंचायत समिती खंडाळा तेथून मार्गक्रमण करून पार पडली....,
या स्वराज्य यात्रेमध्ये प्रमुख उपस्थिती महाराष्ट्राचे राज्यसचिव श्री. धनंजय शिंदे व सातारा जिल्ह्याचे युवा अध्यक्ष श्री. धैर्यशील लोखंडे व सातारा जिल्ह्याचे युवा सचिव असिफ तय्यबखान पठाण सहभागी होते
खंडाळा मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्राचे पहिले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण या दोन्ही महापुरुषांना अभिवादन व पुष्पहार अर्पण करून पुण्याच्या दिशेला रवाना झाली व पुण्याहून ही यात्रा मार्गक्रमण करून ६ जून २०२३ रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन समाप्त होईल.
खंडाळा तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते स्वराज यात्रेमध्ये खंडाळा तालुका युवा अध्यक्ष चि. सुरज शिंदे, एडवोकेट इम्तियाज खान, एडवोकेट श्री.रोहिदास हाके, प्राध्यापक श्री. नामदेवराव चव्हाण, उद्योजक श्रेयस जाधव, चि. संकेत घाडगे, सहभागी होते
स्वच्छ पारदर्शक कारभार आम आदमी पार्टी ने दिल्ली आणि पंजाब मध्ये करून दाखवले आहे तसेच सातारा जिल्हा मधील सर्व निवडणूका लढविण्याचा आम आदमी पार्टी चा विचार आहे , सातारा मध्ये परिवर्तनाची गरज आहे हाच संदेश स्वराज्य यात्रा देत आहे.
अशी माहिती वाई- विधानसभा युवा अध्यक्ष चि. साहिल भोसले व यांनी दिली