*फलटण महवितरणे चे श्री. खिलारे यांना निलंबित करा : आम् आदमी पार्टी कडून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मागणी.*
महावितरण चा भोंगळ कारभार.
फलटण महावितरण कडून ऊर्जा मंत्रालय काढून सादर अधिकर्याची कर्तव्यात कसूर केल्याने चौकशी करण्यात आली होती. श्री. भारत खिलारे यांच्यावर कारवाई करा अश्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत.
त्या कारवाई मध्ये त्यांनी लेखी स्वरूपात दिले होते की इथून पुढे माझ्या वर्तणुकीत बदल होईल तसेच मी शेतकर्यांचे फोन उचलून त्यांचे प्रश्न मार्गी लावीन पण असे काही ही न घडता त्यांचा जैसे थे असाच प्रकार चालू आहे .विडणी येथील टिळेकर वस्ती येथे मागील 4 दिवसापासून लाईट नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत आईन उकाड्यात लाईट नसल्यामुळे नागरिक मेटाकुटीला आपले आहेत. कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांशी काहीही घेणे देणे नाही जणू यांचा शेतकरी वैरीच आहे अशी वागणूक हे शेतकऱ्यांना देत असतात ,उर्मट शब्दात शेतकऱ्यांशी बोलले जाते .
अश्या अधिकाऱ्याची काम करण्याची मानसिकता दिसत नसून फक्त लाच खोरी पद्धतीने पैसा गोळा करण्यासाठी खुर्ची चा वापर केला जातोय असे स्पष्ट पण दिसत आहे .
त्यामुळे भ्रष्ट अधिकारी खिलारे साहेब यांना निलंबित करावे ही मागणी आहे तसे न झाल्यास आम आदमी पक्षाचे फलटण तालुका उपाध्यक्ष श्री अनिकेत किसन नाळे,आम् आदमी पार्टी चे सातारा जिल्हा युवा अध्यक्ष श्री धैर्यशील अंकुशराव लोखंडे
यांच्या कडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे .