महाराष्ट्र राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती बँका ह्या शेतकऱ्यांना व शेती हितासाठी अर्थसाहाय्य करणाऱ्या बँका आहेत. ह्या सर्व बँका जेमतेम यश मिळवत असताना सातारा जिल्हा बँक गेली अनेक वर्षे 100% कर्जवसुली, हजारो कोटींच्या व्यवसायाबरोबर शेतकर्यांसारखे दुर्बल ग्राहक घटक असलेल्या बँकिंग व्यवसायातून शेकडो कोटींचा नफा मिळवत असल्याचे आढळून आले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक असा कोणता व्यवसायिक मॉडेल वापरते जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील सर्वच शेतकरी केंद्रित जिल्हा बँकांमध्ये तो वापरून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया सक्षम करत महाराष्ट्र राज्याचा विकास होईल ह्या जिज्ञासेतून कण्हेरखेड गावचे सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते श्री किशोर शिंदे यांनी बँकेच्या व्यवसाय व धोरणांचा अभ्यास सुरु केला. सदर अभ्यासातून अनेक भयंकर बाबी त्यांच्या समोर आल्या. त्यातून त्यांनी कोविड काळात व त्यानंतरसुद्धा बँकेने जगभरात सर्वच वित्तीय व्यवस्थांनी आपल्या कर्जदारांना दिलेल्या ऋणात मोठया फरकाने व्याजदरात कपात केली, परंतु सातारा जिल्हा बँकेने महामारीच्या काळात व नंतरही 13% पर्यंतची वसुली सुरु ठेवली होती. श्री किशोर शिंदे यांनी केलेल्या तक्रारीनंतर सातारा जिल्हा बँकेने 0.5 ते 3% पर्यंत कर्जाचे व्याजदर उतरवले असले तरी आजपर्यंत इतक्या चढ्या दराने कर्ज देणाऱ्या जिल्हा बँकेकडे शेतकऱ्यांच्या मालकीच्या 953 विकास सेवा सोसायटीचा 100% व्यवसायाची मक्तेदारी कशी यावरून आणखी माहिती घेण्याचे प्रयत्न सुरु केले असता सातारा जिल्हा बँक सिओ आणी सातारा डिस्ट्रिक्ट सुपरव्हिजनच्या बाबतीतील एक महाभयंकर बाब समोर आली ती म्हणजे दुबार पीककर्ज वाटप घोटाळा. याचे सूत्रधार जिल्हा बँकेचे सिओ राजेंद्र सरकाळे व बँकेतील अनेक महत्वाचे घटक आहेत हे समजल्यावर अनेक पुराव्यानिशी त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणा ईडीला तक्रार केली.
ईडीने प्राप्त पुरावे व जिल्हा बँकेचे संशय निर्माण करणारे आकडेवारी पाहत ह्या सुनियोजित दुबार पीककर्ज वाटप घोटाळ्यात सहकार आयुक्त, पुणे यांच्यामार्फत सातारा जिल्हा बँक दुबारपीककर्ज, फौजदारी गुन्हे इत्यादी विषयावर माहितीसाठी नोटीस काढली.सहकार आयुक्त कार्यालयाने ह्या बाबतीत सातारा जिल्हा उप निबंधक ( संशयित ) यांना सदर प्रकारणात जिल्हा बँकेच्या दुबार पीककर्ज घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सूचना केल्या. ईडीची नोटीस येऊन 6 महिने झाले तरी सातारा जिल्हा बँक प्रशासनाने कोणतीही माहिती न देता असहकार केल्याची बाब सातारा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने यंत्रणेला कळवली. यावरून हे प्रकरण अत्यंत गंभीर असून सातारा जिल्हा बँकेतील बाहुबली आमदार, खासदार संचालक यांच्या दबावामुळे जिल्हा बँकेची चौकशी करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सातारा जिल्हा बँकेने नुकताच 200 कोटींचा नफा जाहिर केल्याचे कळवले असले तरी त्यांच्या बाबतीत अनेक मुद्द्यावर सर्व महाराष्ट्र राज्याला माहिती व्हावी अशा महत्वपूर्ण प्रशांची यादी श्री किशोर शिंदे यांनी पत्रकार, वृत्तपत्रं व इलेक्ट्रॉनिक माध्यमांना दिली व याबद्दल केंद्र, राज्य शासन, केंद्रीय तपास यंत्रणा यांना याबाबतीत गांभीर्याने चौकशी करण्याची विनंती केली.
नाबार्ड पुरस्कार विजेत्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याच्या सर्व माध्यमांनी बँकेचे सिओ, सचिव केडर प्रशासन व संचालक मंडळाला काही महत्वपूर्ण मुद्द्यांवर खुलासा मागितला तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा खरा चेहरा व 1000 कोटींचा नियोजित दुबारपीककर्ज वाटप घोटाळा संपूर्ण जगासमोर येईल.
महाराष्ट्र राज्याच्या 31 जिल्हा बँकांना उपयोगी पडेल असा कोणता व्यावसायिक मॉडेल सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक अवलंबतें याचा खुलासा सातारा जिल्हा बँक प्रशासनाने खालीलं महत्वपूर्ण बाबींचा आम्हाला, वृत्तपत्रं, माध्यमं व शासनाला खालील बाबींचा पुराव्यासह खुलासा संपूर्ण महाराष्ट्र राज्याला जरूर करा.
1) सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जर त्यांच्या उत्पादनाचे पैसे 12 महिन्यात भेटतच नाहीत तर मग बँकेकडे त्यांच्या विकास सेवा सोसायटीच्या 100% वसुलीचा फॉर्म्युला नेमका काय.?
2) जर सातारा जिल्हा बँक सातत्याने 100% वसुली करतेय तर विविध कर्जमाफी प्रोग्राममध्ये जिल्हा बँकेकडून कोणत्या याद्या यंत्रणाना दिल्या गेल्या व आजपर्यंतच्या सर्व कर्जमाफी योजनानिहाय किती पैसे शासनाकडून मिळाले.
3) आमच्या तक्रारीनंतर जिल्हा बँकेने सर्व प्रकारच्या कर्जांचे व्याजदर उतरवले, विकास सेवा सोसायटीमध्ये दरफलक लावले तें चांगलं केलं पण 2 वर्षांच्या कोविड काळात बँकेने देशाच्या केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व कर्ज प्रकरणात 3 तें 6 महिन्याची मुभा किती ग्राहकांना दिली?
4) सातारा जिल्हा बँकेकडे सर्व प्रकारचा व्यवसाय मिळवून देण्यासाठी विक्री ( सेल्स टीम )आहे का? त्यांच्यावर किती खर्च होतो?
5) 953 विकास सेवा सोसायटी स्वायत्त असूनही त्यांचा 100% व्यवसाय फक्त जिल्हा बँकेकडे कसा? त्या 953 विकास सेवा सोसायटीकडून जिल्हा बँकेचा एकूण व्यवसाय किती?
6) डिस्ट्रिक्ट केडर सुपरव्हिजनच्या ह्या विकास सेवा सोसायटीच्या सचिवांच्या संघटनेच्या बोर्डमध्ये जिल्हा बँकेचे 4 संचालक, बँकेचे अध्यक्ष, बँकेचे सिओ यांचं राहण्याचा नेमका उद्देश तरी काय?
7) डिस्ट्रिक्ट सुपरव्हिजनच्या सर्व सचिवांची आगाऊ पगार वर्गणी शेतकरी मालक असलेल्या संस्थांनी का द्यावी? व ती आगाऊ देने कोणत्या कायद्याने बंधनकारक? विकास सेवा सोसायटया यांना बँक किंवा डिस्ट्रिक्ट सुपरव्हिजन असा कोणता पत्रव्यवहार करतात जेणेकरून सर्व स्वायत्त विकास सेवा सोसायटया यांनी पगार वर्गणी आगाऊ सुपूर्द करत आले आहेत.
8) ईडीने सहकार आयुक्त यांच्यामार्फत मागणी केलेल्या जिल्हा बँक दुबार पीककर्ज घोटाळा, त्या संबंधित फौजदारी गुन्हे इत्यादी बाबींवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सातारा जिल्हा बँकेला कधी माहिती मागितली? बँक प्रशासनाने त्यावर कधी व काय माहिती पुरवली?
9) जिल्ह्यातील दुबार पीककर्ज प्रकरण होऊ नयेत म्हणून बँकेने सर्व विकास सेवा सोसायटी व्यवस्थापनाला परिपत्रक काढलं होतं, त्या अनुषंगाने आता जिल्ह्यातील दुबार पीककर्ज प्रकरणे थांबली का?
10) जिल्हा बँक नियंत्रित केडर सचिवांच्या बाबतीतील आजवर किती तक्रारी प्राप्त झाल्या व त्यावर आजपर्यंत काय व किती सचिवांवर कारवाई झाल्या?
11) दुबार पीककर्ज घोटाळ्यातील पुराव्यासह कबुली दिलेले सचिव बजरंग केंजळे व कण्हेरखेड माजी सरपंच यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही?
12) विकास सेवा सोसायटी सचिवांनी केलेल्या खोटे कर्ज प्रकरण, बोगस कर्जमाफी यात बँक कर्मचाऱ्यांना सुद्धा जबाबदार धरलं पाहिजे या गंभीर प्रश्नांवर जिल्हा बँक प्रशासनाची गप्प बसण्याची भूमिका का?
13) नोटबंदीतं जिल्हा बँकेकडून किती कोटींच्या चलनाचे अदलाबदली झाले व किती रक्कम बदली झाल्याशिवाय सातारा जिल्हा बँकेत पडून आहेत याची विशेष चौकशी व्हावी.
सातारा जिह्यातील व महाराष्ट्रातील सर्व सन्माननीय पत्रकार, संपादक, वृत्तपत्रं यांना नम्र विनंती आहे की वरील 13 प्रश्नांचा सातारा जिल्हा बँक व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून पुरव्यानिशी खुलासा मिळवल्यास. संपूर्ण जिल्ह्यात, राज्यात व देशासमोर सातारा जिल्हा बँकेचे जे चित्रं उभं करण्यात आलं होतं तें स्पष्ट होईल आणी
शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी मागणी श्री किशोर शिंदे,आम् आदमी पार्टी चे सातारा जिल्हा युवा अध्यक्ष श्री.धैर्यशील अंकुशराव लोखंडे तसेच श्री.अनिकेत किसन नाळे यांनी केली.