फलटण महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी.
उन्हाळ्याचे दिवस असून ही दिवस दिवस वीज नाही .शेतकऱ्यांच्या पिकाचा प्रश्न आहे पीक जळून चालली आहेत .वीज पुरवठा खंडित केला जातोय कोणतीही पूर्व सूचना ना देता. गुरुवार ,शुक्रवार ,शनिवार, रविवारी रात्री चेंज ओव्हर होत नाही त्यामुळे वीज नाही .तसेच सोमवार ,मंगळवार , बुधवार, गुरुवार दिवस भर वीज नाही कारण विचारले असता लोड शेडींग असल्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून समजते.शेतकऱ्याला वाली कोणी आहे की सर्वांनी फक्त नी फक्त शेतकर्यांची पिळवणूक करायची ठरवले आहे असा प्रश्न निर्माण होतोय तसेच ट्रान्सफॉर्मर चोरी ला जाण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यासाठी काही उपाय योजना करता येतील त्या बद्दल विचार करावा लागेल .चोरीला जातोय म्हणून ट्रान्सफॉर्मर च बसवून न देणे कितपत योग्य आहे तसेच जळालेले ट्रान्सफॉर्मर बसवून द्यावेत .शेतकर्यांचे खूप नुकसान होत आहे महावितरण च्या कारभारामुळे त्यावर योग्य ती मार्ग काढून उपाय योजना करून सर्व शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी.
फलटण महावितरण चे मुख्य अभियंता श्री. आवळेकर साहेब यांना काही विचारायला गेले किंवा शेतकऱ्यांना त्रास का होतोय याचा जाब विचारला तर 353 दाखल करण्याची धमकी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळतेय .तसेच जमाले साहेब डायरेक्ट विचारतात तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने भांडणारे कोण किंवा तुम्हाला हा अधिकार दिला कोणी ? अधिकाऱ्यांची मग्रुरी शेतकऱ्यांना त्रास ठरतेय.
सामान्य शेतकऱ्याने जाब विचारल्यास आम्हाला अजून आमदार खासदार ही असे बोलले नाहीत असे तुम्ही बोलत आहात तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही असे ही आतिरिक्त सहायक अभियंता श्री.जमाले साहेब म्हणतात म्हणजे सर्व सामान्य नागरिकाला त्याच्या बाजू मांडण्याचा अधिकार नाही का ?
असे प्रश्न भारत सरकार मान्यता प्राप्त जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष तसेच आम् आदमी पार्टी चे फलटण तालुका उपाध्यक्ष श्री अनिकेत किसन नाळे यांनी उपस्थित केले आहेत .
हा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये चा भोंगळ कारभार थांबणार तरी कधी ?
थ्री फेज लाईट नाही .शेतकऱ्याने पिकाला पाणी कधी द्यायचे.
Deposit भरून 10-10 वर्ष कनेक्शन देत नाहीत एवढा भोंगळ कारभार चालू आहे .आणि शेतकऱ्यांनी deposit भरून कनेक्शन मिळत नाही पिकाला पाणी मिळण्यासाठी आकडे टाकले तर ते आकडे काढून त्यांच्यावर कारवाई केली जातेय .
मग तुम्ही 10-10 वर्ष कनेक्शन देत नाहीत .त्या वर कोणती कारवाई करावी .
कायदे सर्वांना समान आहेत. असे श्री.अनिकेत किसन नाळे आम् आदमी पार्टी च्या वतीने म्हणाले.