*"हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी फुले मेटा-हायझियम एक प्रभावी अस्त्र"*
आरोग्यम धनसंपदा या पंक्तीशी सर्वच सहमत "आहेत, मात्र गेल्या काही वर्षापासून रासायनिक खतांच्या आणि कीडनाशकांच्या अतिवापराचे घातक परिणाम दिसून येत आहेत दिवसेंदिवस कॅन्सरग्रस्तांची संख्या वाढत आहे. मानवी आरोग्याबरोबरच जैवविविधतेचा समतोलही बिघडत आहे. त्यामुळे जैविक शेती कडे वळताना रसायनांचा वापर कमी करून जैविक खते व किडनाशकांचा वापर ही आजच्या काळाची गरज आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत येणारे कृषी महाविद्यालय पुणे येथे जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळेमध्ये कृषि पदविच्या आठव्या सत्रातील विद्यार्थी कृषि कार्यानुभवातून विविध जैविक घटकांची निर्मिती करीत आहेत. असेच एक जैविक कीडनाशक फुले मेटऱ्हायझियम तयार केले जात असून ते 200/- रुपये प्रति किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. मेटऱ्हायझियमचा वापर हुमणी अळी, पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, मावा, फुलकिडे, तुडतुडे इ. किडींच्या नियंत्रणाखाली केला जातो.
प्रामुख्याने ऊस, भात, भुईमूग, मका, बाजरी इ. खरीप
हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या
हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी मेटऱ्हायझियम हे
प्रभावी जैविक कीडनाशक आहे.
पावसाळ्यात हुमणी अळीच्या प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्यामूळे ऊस पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. हुमणीमुळे होणारे नुकसान प्रथमावस्थेतील अळ्या पिकांची तंतुमुळे खातात. ती उपलब्ध नसल्यास सेंद्रिय पदार्थ खातात तंतुमुळांचा फडशा पाडल्यानंतर मुख्य मूळे खाण्यास सुरू करतात. परिणामी झाड वाळते. एका झाडाचे मूळ कुरतडून खाल्यानंतर हुमणी दुसऱ्या झाडाकडे वळते. शेतात एका ओळीत झाडे वाळल्याचे दिसून येते. प्रामुख्याने ऑगस्ट- सप्टेंबर या महिन्यांमध्ये हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे जास्त नुकसान होते.
मेटऱ्हायझियम विषयी :- हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी वापरले जाणारे मेटऱ्हायझियम बुरशीयुक्त जैविक कीडनाशक आहे. मेटऱ्हायझियम हुमणी अळीच्या शरीरात शिरून उपजीविका करते. मेटऱ्हायझियमच्या संपर्कात आलेली अळी साधारण 15 दिवसांत मरते. मेटा-हायझियम वापरण्याची पद्धत : 1) प्रति एकरी ऊस पिकासाठी 8 किलो फुले मेटऱ्हायझियम शेणखतात मिसळून पिकास देणे
2) प्रतिलीटर पाण्यात 10 ग्रॅम 'फुले मेटऱ्हायझियम मिसळून रान वापशावर असताना उसाच्या खोडाल आळवणी करणे.
कृषी पदवीच्या आठव्या सत्रातील कार्यानुभवात्मक शिक्षण या अंतर्गत डॉ न. द. तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश अभंग, सौरभ आटोळे, सौरभ धामणे, शिवम घनवट, हे विद्यार्थी जैविक कीडनाशके तयार करण्याचे प्रशिक्षण घेत आहेत.